Devotional Collection

घागर माळ

घागर माळ

लीळाचरित्र : उत्तरार्ध

१३३ ....उद्ग्रहणीका ईश्वर प्रतीती करणे

लीळाचरित्र : पूर्वार्ध

१८२ तथा ईश्वर प्रतीती पुसणे

विना ( बीणा )

विना ( बीणा )

लीळाचरित्र : उत्तरार्ध

३७७ अमर्दक तापोधने देवता अज्ञान कथन

आवंढे गांवो की नागनाथु देवो : ना आवंढे देवो की : नागनाथु पाटण:  नागनाथु चांडी की

बीणी: एउ हो न जाणो: हो अछू पुडा पातळीउपरी:

पोफळ फोडणा

पोफळ फोडणा

लीळाचरित्र : पूर्वार्ध

१७२ आसुटीए द्रव्य कथन

“ हो का जी :” बाइसी म्हणीतले :” बाबाते एकु पोफळ फोडणा: रवण भवणु: तो बाबा गाहाणु ठेवीती: बाबा : हा : पोफळ फोडणा गाहाणु ठेवीजैल:

२३३ मार्गी पोफळ फोडणा गाहाण ठेवणे

सर्वज्ञे .... “बाइ: पोफळ फोडणा गाहाण ठेवा :” पोफळ फोडणा गाहाण ठेविला: मग वेचु आणिला: तव डखले पोटी म्हनो लागले:

बैलगाडी

बैलगाडी

श्री गोविंद प्रभू चरित्र

१७३ गाडांचा गुळु वीखुरने

श्री करू घातला :आणि तीही नेणता श्री करू धरिला : आणि गोसावी कोपु नटले : श्री करे धरुनि उचलुनि यरिवाही गाडा घातला : आणि श्री चरणावरी गुळू विन्धुसीला:
 

लीळाचरित्र : उत्तरार्ध

११ पर्वी दाइंबा प्रमादवचनी सीक्षापण

मग उदेया काउळगावा गेले :तव विष्णुदेव गोसावियांचेया दरीसना जावेयाची आईति करीताती: गाडा उपाहाराची आईति : दाइंबासी भेटी जाली : 

तांब्तोळी

तांब्तोळी

प्रातःकाळ पुजावसार

ओटेयावरि सयनासन असे ते पद्मासन रचीती: उष्णोदकाची ताम्बतोली: बहिरवासाची घडी : घेउनि: दारवंठा उभी असती : भटोबास  साउमे एति: बाइसे भटोबासाचा हाती देति:

गाडू

गाडू

लीळाचरित्र : पूर्वार्ध

४८० माहादाइसी महात्मेया दिवाळी सणु करवणे

माहादाइसे गाडू ढाळीति: बाइसे श्री मुकुटू चोखीति: श्री मूर्ति प्रक्षाळीति: भगतिजन सोंडिए-तळी रीगोनी गोसावीयाचेनी उदके नहाले : सेवटी श्री मुगुटावरी गाडू ढाळीति:
 

लीळाचरित्र : उत्तरार्ध

६ भोजया इंद्रवणी

दाइंबासी खरुज जाली होती : गोसावियांसी माद्ने जाले : दाइंबा गाडू ढाळीति : बाइसे श्री मुकुटू चोखीति : बाइसे वस्त्रे आणु गेली : मग दाइंबा गाडू न ढाळीति : मा पाणी उरले होते : मग दायांबा आंग धो लागले:

३०१ गदोनायाकाची पुजा: द्रव्यादीभजने ईश्वरप्राप्ती निषेध

तेथ गोसावियांसी आसन जाले: गादोनायाके गोसावियांचा श्री मुकुटी चोखाली लाविली : मग बाइसे गाडू ढाळीति: गादोनायक श्री मुकुटीची सेवा करिती :

तांबीया

तांबीया

लीळाचरित्र : पूर्वार्ध

३८६ रात्री ब्राहम्णाघरी पुजा आरोगण 

गोसवीयांते तेथ आसन जाले : तेयांची ब्रहामणी गोसवीयांचे श्री चरण प्रक्षालावेया तंबीया भरुनी उदका घेउनी आली : तीएचिए हातीचा तांबीया बाइसी घेतला:

उतरंडी गडबडी

उतरंडी गडबडी

तळिचील हाणितलेयां वरिचील पडे : उतरंडी गडबडी ॥५६॥।

शहम्रीगाचे आंडे

शहम्रीगाचे आंडे

कनासिची आरती

भरजरी चांदवा तकया लोड गादी

वरी शहा म्रिगांची अंडी शोभा देती

घाट दिवा ( लांबन दिवा )

घाट दिवा ( लांबन दिवा )

लीळाचरित्र : पूर्वार्ध

९४ गुंफे चोरवीद्रावण

ऐसा एकु दिसू दाराठीयाहुनी बोणेबाईयांचीये गुंफे चोरू रिगाला : भीतरी घांट ऐसा दीवा पाजळतु असे: तेणे आपुली जाडी अंगणी पसरीली : बोणेबाइयांची वाटी : परीवंट:

कापडी तांब्या , वाटी , पात्र , भांडे

कापडी तांब्या , वाटी , पात्र , भांडे

खादीचा कपडा, बिब्यचे तेल यापासून महानुभाव संतांनी बनविलेली भांडी

डोणी

डोणी

लीळाचरित्र : पूर्वार्ध

५४४ डोणी उतरौनी पंचालेस्वरी अवस्थान
तेथौनि गोसावीं बीजें केलें : पौंबळदरडिवरिलीकडे ओतापासि डोणीसि

गोसावी बैसले : बाइसें मुक्षकरूने अवघीं भगतिजनें बैसलीं : गोसावी गंगा

वाटी (वाटा)

वाटी (वाटा)

प्रसादसेवा

धातुमध्ये वांकी: सांखळे: कांबी: पालिमांडे: आर्ति: थाळा: ताट: वाटे: वाटी:
 

लीळाचरित्र : पूर्वार्ध

८४ वडातळी रामदेवा भेटि

मग गोसावीयांसी वाटा दधिभातु आणिला: सागळे उदक आणिले:

८५ रात्री गोपाळी वसती: आरोगण

मग रामदेवी रात्री वाटा भातु: तांबीया दुधु; पापडू: तांबा उदकाभरुनी आणिला:

 

लीळाचरित्र : उत्तरार्ध

९० पिंपळे वामनभट्टखीरीभोजनी भटा विस्मो

बाइसी वाटे पुढा ठेविले: जेविती: घासु घेति: आणि बाइसा वास पाहाति: ऐसे जेवीत असती : आणि एकसरी वाटेयांचा

१५१ आक्षेत्रितीए लाहामाइसा आनीत उदकपान

खोला पाणीयांतु बुडकलौनि भरुनि घेऊनि आली : वाटे उटिळे : मग  गोसावीयांसि उदक ओळगविले: मग गोसवी स्वीकरीले :

दुधी करंटा

दुधी करंटा

लीळाचरित्र : पूर्वार्ध

१०५ प्रतेस्थानी बाइसा भेटि

मग गोसावीयांसि दुदीकरंटा पाणीभाताची आरोगण जाली: मग बाइसे गोसावीयांते पुसो लागली: “ बा मौन्यदेव हो :

चाड

चाड

स्मरीति स्थळ

२५५ वैजोबा चाडेयावारी मूठी धरणी: गुरुकुळभाग्य पीको महान्नने

दुकल पडिला होता : मग प्रज्न्ये काळू आला : आण वैजोबाये चाडेयावारी मूठी धरिली:

पळी

पळी

लीळाचरित्र : उत्तरार्ध

५०५ सुद्रसुखा अनुवादु

दाळी तया ठोंबरेयावरी घाली: मग कालवी: थारली पाळी: मग ते पाळीभरी

साहान

साहान

लीळाचरित्र : पूर्वार्ध

४४६ प्रकासदेवाचिए गुंफेसी बीजें करणे

 गोसावी चरणक्षाळन करविले: साहानेवरी चंदन होते: तेयाचा गोसावी आपणेयासी आडा रेखविला : सुकली ऐसी माळ होती:
 

लीळाचरित्र : उत्तरार्ध

३९ निरुपिता भटा ईश्वर अप्राप्ती करणे

खरसाहाणे लावी : तेणे करुनी एक खते झाडी : तेलसाहाणे लावी : तेणे करुनी एक खते झाडी : तुपसाहाणे लावी : तेणे करुनी एक खते झाडी:

कळस

कळस

लीळाचरित्र : पूर्वार्ध

१६४ ..... उपन्हो त्यागु

बटिका : हे देखिले गा परमेश्वरपुर: साळेचा कळसु दीसतु असे: एथ श्री प्रभु राज्य करीत असती
 

लीळाचरित्र : उत्तरार्ध

५२४ जोगरेया अनुताप अनुवाद

देवता मह.... वैसाखिये मासी द्वारकेचे कळस दीसती: मग जगदिशे उदकांत द्वारावातीयेचे कळस दाखवीले:

कमंडलू

कमंडलू

अज्ञात लीळा

१०७ श्रावणा भगति कथन

तव  दशरथु पाणिएड राखत होता : कमंडलु भुडभुडकरि वाजीनला: दशरथु महीन...

पोहरा

पोहरा

प्रसादसेवा

चरणगादी: पाटगादी: दाडीएचा बोखारु: ओसाडी: पाखाळ: पोहरा: सागळ: उपनहो: काकोचा करवता: मुख्यकरुनी

पाईली

पाईली

लीळाचरित्र : उत्तरार्ध 

 १० सर्पदस्त माळी रक्षणे

तो एथ घातला असे : बापुडी माळीणी दुख करीती आहे : चोभेया  पाईलियेचा लेंकुरवे: मुंगीयांचा धवी आगी लागली :

धुपटणे

धुपटणे

लीळाचरित्र : उत्तरार्ध

केसकालाप धूपावेया कारणे धुपटणे पहातु होता : तव धुपटणे नेदेखे: केस काळाप वळती तरि धूपू न लगे:
 

प्रातःकाळ पुजावसर

बाईसे धुपटणा अंगारा आणीती: तयावरी दसांग धुप घालिति: पांचे वाती उजळिती: आर्ती पालमांडा ठेविती:

पंचारती

पंचारती

प्रातःकाळ पुजावसर

बाईसे धुपटणा अंगारा आणीती: तयावरी दसांग धुप घालिति: पांचे वाती उजळिती: आर्ती पालमांडा ठेविती:

वोडन खंडे

वोडन खंडे

लीळाचरित्र : उत्तरार्ध

गोसावी बीजे केले: बाहिरी गुंफेसी नागोवा केला: भटी एका राउतपाइकाचे वोडण खंडे हरितले:

मुसळ

मुसळ

लीळाचरित्र : उत्तरार्ध

३१६ मुसळबुडी निरुपण

सर्वज्ञ ..... “भोजया : बुडी मात्र दीजे : जी जी : ते कैसे जी” ? सर्वज्ञ ..... “ दीजे ऐसी मुसळबुडी ” : “ जी जी : तरि मुसळबुडी म्हणिजे काई?” सर्वज्ञ......पाणियांतु मुसळ घालिजे : ते सळकरी वरुते ये :

फाळ. पास . तुता . कुर्हाड. विला

फाळ. पास . तुता . कुर्हाड. विला

लीळाचरित्र : पूर्वार्ध

असती तेतुकीही माझिये बाजेखाली ठेवा : लोखंडे बाजेखाली ठेविली : पासु : फाळू: कुल्हारी : इळां: मध्याने एकी रात्री तो महात्मा उठिला : आवघेयासी परीसू लाविला:

 

लीळाचरित्र : उत्तरार्ध

१६१ महादाइसा वाराणसी गमन निक्षेद

चाटू

चाटू

दृष्टांत 64 : चाटिसएचा

लीळाचरित्र : उत्तरार्ध

५६४ देमाइसांते राहावणे्

कीजैलः परि  चाटसी स्थानीं होआवें कीं: देमतीः”” यावरि चाटसीएचा

दृष्टान्तु निरुपिलाः (सर्वर्जे म्हणीतलेंः ““सुगरणि असेः ते चाटुसीएतें व्यापारवीत

व्यापारवीत पाकनिष्पति करीः आंबाआंतु घालीः खीरीआंतु घालीः खडुरसपाकाआंतु

घालीः तेसें ईश्वरु जीवातें व्यापारवीतव्यापारवीत साधननिष्पति करीति“: '”) मग'

सुप

सुप

दृष्टांत 68 : दुबळीए मातेचा आिण

लीळाचरित्र : उत्तरार्ध

६२१ भक्तीउपाबो नीरुपणें

आग्रहो जरी होए तरि परमेश्वरू ज्ञानीयांसि प्रेम देति: जैसा दुबळीए मातेचा:

दुबळीए मातेचें लेंकरू आळी' करुनि दुधभातु जेउं मागे'': मग ते सुप चाटु

गाहाण  तयांसि दुधभातु'  जेउं घाली'*: तेसा जीवासि अग्रहो नाहीं: आणि

काशाचा थाळा

काशाचा थाळा

लीळाचरित्र : उत्तरार्ध

५०५ सुदसुखा अनुदादु

पाहुनि मग घरासि जाए: बाजुलेयापासीं पीर्ढे घेउनि बेसे: बोणवोनि बाजुलेयाखालि

बोडवणें असे तें घेः मग तीया उन ठोंबरा रांधिला असेः तो थाळां घालौनि

उन्हउन्ह  घेउनि ए: पळिए बीतीगी करीः ते तया ठोंबरेयावरि घाली: दाळि

तया ठोंबरेयावरि घाली; मग कालवी: धारली पाळि करी: मग ते पाळिभरि

कुदळ

कुदळ

लीळाचरित्र : पूर्वार्ध

५१ भांडारेकारां देहअवसान
सन्यधानः ऐसी उसीसें मांडी कैची जी? होआवें काहीं तें आतांचि होआवें जी: ''

श्रीमुख अवळोकितांः मग देहअवसान जालें: बडुबांकरवि 'कुदळीपाउडें आणवीलें:

खांच खणीतलीः गोसावीं रीगौनि पाहिलें: डोइएकडे गोसावीं धरीलेंः पायांकडे

बडुआं धरिलेंः मग ऐसा नीक्षेपु केला: मग सर्वज्ञें म्हणीतलें: 'मग बाइ: यांसि

कवडे

कवडे

दृष्टांत 8 : समुिाचा आिण

लीळाचरित्र : उत्तरार्ध

२८३ खेइगोइप्रति चतुर्विध दान निरूपर्णा

लागली: गोसावी तयासि चतुर्विधदान निरूपण केले":  म्हणीतर्लेः 

परमेश्वरापासोनि चतुर्विध दान आतिः कव्हणी एक समुद्रासि  जातिः एक

कवडे देखतिः ते कवडे भरीतिः ते कवडांचि धाले जातिः एक म्हणतिः 'इये

माणीक मोती

माणीक मोती

दृष्टांत 8 : समुिाचा आिण

लीळाचरित्र : उत्तरार्ध

२८३ खेइगोइप्रति चतुर्विध दान निरूपर्णा

 देखतिः ते कबडे भरीतिः ते कबडांचि धाले जातिः एक म्हणतिः 

समुद्री माणीके मोतीर्ये असतिः' ते परते जातिः ते माणिकें भरीतिः ते

तेणेंचि धाले जातिः एक म्हणतिः “हा समुद्दुः इये समुद्री काइएक नसे? इये

चवरी

चवरी

लीळाचरित्र : उत्तरार्ध

२३३ यात्राहाटी ग्राहीकचेखुस्वीकारु

ग्राहीकी करीतिः मग आणिकी ठाईं करीति आणि गोसावी बीजें करितिः

कस्तुरिः सडकः  मोतीयें: उंचनिच  दीसु  तवं

आवघेया हाटा संबंधु दीधलाः मग मढासि बीजे केलेंः!!
 

१५७ तथा  मढी माहादाइसास्वेतउपाहारी भर चमरीदंडे ताडणे

भातुः'' भातु घातला : दुध घातलें: जेवा गा: ”” मां आतां काइसेन जेववैल जी“?''

आणि गोसावी चवरीचेनि दांडेनि ठसालिकरि' डोइएवरि हाणितलें: “हां गाः ऐसें

म्हणाल?'' म्हणौनि कोंपराव्ररि हाणतिः “हां गाः जीभे डाओ पडिला ऐसें

म्हणाल?'' जी जी: नेजववे जीः'' आणि गोसावीं गुडघेयावरि हाणतिः '“हां गाः

तांबकळस

तांबकळस

प्रमादमेवा

मुर्तिनिष्टा प्रसादासि माझे दंडवत :। धातुमध्ये  : सांखळे : कांबी : पालिमांडे : आर्ति : थाळा

: ताट: वाटे: बाटी : आरीसा : आरीसाचे लोहो : गंगाळ: तांभाण दोन्ही तांबकळस : आंबिनाथीचे

तांबे : चौरंगाचे लोहो : माहाद्वारीचेया कवाडाचे लोहो : राजमठीचेया कवाडाचे लोहो : काकोचेया